१२१५ रिक्षांवर कारवाई : ११ लाखांहून अधिक दंड; ६ रिक्षा जप्त
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून आणि प्रवाशांशी उद्धटपणे वर्तन करणाऱ्या रिक्षा चालवणाऱ्या १,२१५ रिक्षाचालकांवर शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवून दणकेबाज कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा दंड आकारून १ लाख ३९ हजार ६०० रुपये वसूल केले, तर ६ रिक्षा जप्त केल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग यांनी बुधवारी (दि. २९) दिली.
शहरातील रिक्षाचालक
प्रवाशांशी उध्दटपणे वर्तन केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. रिक्षा चालकांना आळा बसावा, रिक्षा थांब्यावर बेशिस्तपणे रिक्षा लावणे, विना गणवेश रिक्षा चालविणे, फ्रंटसीट प्रवाशी बसविणे, विना
लायसन्स मोठ्या प्रमाणात प्रलंबित दंड असलेल्या रिक्षा, अशा बेशिस्त रिक्षा चालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहर वाहतूक शाखेला दिले होते. पोलिस
धाबे दणाणले
▶ शहर वाहतूक शाखा पोलिसांनी १२१५ रिक्षांवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी बेशिस्त रिक्षा चालकांना ११ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा दंड आकारला. तसेच त्यांच्याकडून एक लाख ३९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. शहर वाहतूक शाखा पोलिसांनी बेशिस्त रिक्षाचालकांवर केलेल्या धडक कारवाईमुळे रिक्षाचालकांत एकच खळबळ उडाली आहे. रिक्षाचालकांनी गणवेश परिधान करुन, रिक्षाची कागदपत्रे सोबत बाळगावीत असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी केले आहे.
उपायुक्त शर्मिष्ठा घारगे वालावलकर, वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेखा लोढे, मंगेश जगताप, पवन चौधरी,
सहाय्यक पोलिस निरीक्षक रविकांत गच्चे, सचिन मिरधे आदींच्या पथकाने मंगळवार, २८ जुलै रोजी सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत रिक्षांची विशेष तपासणी मोहिम राबवली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions











